शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

निवृत्त पोलीस उपअधीक्षकाला साडेचार कोटींना लुटले-कऱ्हाडातून अपहरण-उंब्रजजवळ टाकले -संशयित सापडले कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 19:48 IST

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड  शहरातील एका हॉटेलमधून निवृत्त पोलीस उपअधीक्षका सह दोघांचे अपहरण करुन त्यांच्याकडील सुमारे साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या लुटीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकारी तातडीने कऱ्हाडात दाखल झाले. दरम्यान, या मोठया घटनेतील तीन संशयित रत्नागिरी ...

कऱ्हाड (सातारा) :कऱ्हाड  शहरातील एका हॉटेलमधून निवृत्त पोलीस उपअधीक्षकासह दोघांचे अपहरण करुन त्यांच्याकडील सुमारे साडेचार कोटी रुपयांची रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या लुटीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पोलीस अधिकारी तातडीने कऱ्हाडात दाखल झाले. दरम्यान, या मोठया घटनेतील तीन संशयित रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्वर पोलिसांच्या जाळयात सापडले  आहेत. पोलिसांनी लावलेलंय साफल्यात ते संशयित यशस्वीरीत्या सापडले असून पुढील तपास वेगाने सुरु आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील इंडी परिसरातील काही प्रतिष्ठित मंडळी कऱ्हाडजवळील हायवेवरच्या हॉटेलमध्ये उतरली होती. एका कारखान्याचा एक मोठा व्यवहार करण्यासाठी ही मंडळी आली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकी देऊन एका कारमध्ये बसविले. त्यांच्यासोबत इनोव्हा अन् स्कार्पिओ याही गाड्या होत्या.

कऱ्हाड-उंब्रज दरम्यान या मंडळींकडे असलेली साडेचार कोटींची रोख रक्कम हिसकावून घेऊन यांना उंब्रजजवळ गाडीतून बाहेर फेकून देण्यात आले. त्यानंतर या गाड्या पुन्हा सुसाट कऱ्हाडकडे धावल्या. स्वत:चा जीव वाचवून ही मंडळी कशीबशी कऱ्हाड पोलीस ठाण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांच्या तपासाची चक्रे जोरदार फिरली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह इतर पोलीस अधिकारी कऱ्हाड तत्काळ दाखल झाले.तासवडे अन् किणी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मागविले असून या गाड्यांचा शोध लागल्यानंतरच पोलिसांच्या हाती संशयित लागू शकतील. अवघ्यां काही तासातच पोलिसांनी तपासाचीचक्रे वेगाने फिरवीत या मोठया चोरीच्या आव्हानाला सामोरे जात संशयितांचं मुसक्या आवळल्या

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस